नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गातील अनेक घटकांचा जैवभार सेंद्रिय कर्ब जमिनीतील असेंद्रिय द्रव्ये एकात्म विचार करून त्यांच्या सेंद्रिय जोडण्यांना सूक्ष्म जीव वनस्पती पाणी कीटक पक्षी आदींचा जराही धक्का न लावता त्यांची वैशिष्ट्ये आणि मर्यादा यांचा आदर करून केली जाणारी शेती ! निसर्गात एकाच जमिनीत एकाच वेळी वेगवेगळी झाडे-झुडपे-गवते आणि वेगवेगळे जीवजंतू असतात. सर्वांना सारखे महत्त्व असणारे विविधतेचे हे सूत्र नैसर्गिक शेतीतही असते; म्हणूनच नैसर्गिक शेतीमध्ये एकपीक पद्धती अनुस्यूत नाही. नैसर्गिक शेती बहुपीक आणि बहुस्तरीय असते. केवळ शेतीच नव्हे तर त्याबरोबर आपली जीवनशैलीही निसर्गाला अनुसरून असणे अपेक्षित आहे. थोडक्यात ही केवळ शेती नाही तर जीवनदृष्टी आणि जीवनशैली आहे. राजेंद्र भट नैसर्गिक शेती पद्धतीचे बहुस्तरीय रूप उलगडून दाखवत तिचे सखोल आणि सर्वांगीण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करतात. प्रत्यक्ष अनुभव अभ्यास आणि चिंतन यातून साकार झालेले त्यांचे हे लेखन अधिक मौल्यवान आणि उपयुक्त ठरते. शेतकरी अभ्यासक अध्यापक पर्यावरण व परिसंस्थेचे रक्षक सर्वानाच उपयुक्त ठरणारे पुस्तक पहिल्या पिढीतील शेतकरी १९९०मध्ये बदलापूरजवळ बेंडशिळ गावात (तालुका अंबरनाथ जिल्हा : ठाणे) शेती विकत घेऊन सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. १९९० पासूनच मृदा आणि जल संधारण १९९३मध्ये वयाच्या पस्तिशीत नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती. आपल्या जेवणाच्या ताटातील जास्तीत जास्त अन आपल्याच शेतात तयार करण्याचा प्रयत्न भातापासून मोहरीपर्यंत आणि नारळापासून मिरीपर्यंत बहुस्तरीय बहुपीक पद्धतीने शेती सदस्य नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय सल्लागार समिती कृषी आधारित ग्रामीण विकास यासाठी एका NGO मध्ये आठ वर्ष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी प्राचार्य म्हणून एक वर्ष काम कृषी सल्लागार कृषी पर्यटन व कृषी प्रशिक्षण या क्षेत्रांत कार्यरत आजवर १९५ सेंद्रिय आणि नैसर्गिक कृषी प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. रेडिओ दूरदर्शन वृत्तपत्रांतील सदरलेखन पुस्तके ''निसर्गमित्र'' नावाने यू-ट्यूब चॅनल अशा विविध प्रसारमाध्यमांतून पर्यावरण व सेंद्रिय शेती संवर्धनासाठी काम २०१२-१३चा विभागीय सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कार; २०१७मध्ये राष्ट्रीय पातळीवर पहिल्या दहा व्यक्तींमध्ये मानांकन
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.