*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹175
₹190
7% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
महाराष्ट्रातील सर्वच विभागात जिज्ञासू चाणाक्ष जिद्दी आणि शेती विकासाशी बांधिलकी असलेले असंख्य प्रगतिशील शेतकरी आहेत. हे सर्व जण तंत्रज्ञान प्रसाराचे चांगले काम करीत आहेत. अशा प्रगतिशील शेतकऱ्यांपैकी एक आहेत जळगाव जिल्ह्याच्या लोहारा गावशिवारातील विश्वासभाऊ पाटील. त्यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून तंत्रज्ञानाचा चिकित्सक अभ्यास आणि काटेकोर आर्थिक गणितातून कोरडवाहू शेतीचे ‘शाश्वत मॉडेल विकसित केले आहे. यामध्ये जमीन व्यवस्थापन आंतरपीक पद्धती वनशेती मृद् संधारण भूजल संवर्धन सेंद्रिय कर्ब संवर्धन हिरवळीची पिके आणि पिकांचे अवशेष शेणखत जिवामृत दशपर्णी अर्क मित्रकिडींचे संगोपन जैविक खते पशुपालन आदी बाबींचा समावेश आहे. भारत आणि इस्त्राईल मधील शेती संशोधन केंद्रांना दिलेल्या भेटीतून त्यांच्या गुणग्राहक नजरेने टिपलेले आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आपल्या शेती पद्धतीमध्ये वापरले. कोरडवाहू शेती मॉडेलची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या व्यवस्थापन समितीवरही विश्वासभाऊंची नेमणूक झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा कृषिरत्न कृषिभूषण पुरस्कार याचबरोबरीने राष्ट्रीय पातळीवर ‘हार्वेस्ट ऑफ होप पुरस्कार गुजरात सरकारचा ‘श्रेष्ठ किसान पुरस्कार ही विश्वासभाऊंच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल. गेल्या पाच दशकांतील शेतीमधील अनुभव या पुस्तकाच्या रूपाने शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहेत. लेखकाविषयी माहिती : अमित गद्रे हे दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे एमएससी कृषी (अर्थशास्त्र) या विषयातील पदवीधर आहेत. सध्या अमित गद्रे दैनिक ‘ॲग्रोवनमध्ये मुख्य उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत.