जगतसागरी जरी असतील ह्या किती शंखशिंपले क्वचितच मिळती मोती अंतरी पहावया आगळे परी एक स्थळ आहे जगती अगदी जगावेगळे ''त्रिवेनीता'' या दो सरितांनी सस्नेह निर्मियले रंग रूप वय जात-धर्म ना कसलेच इथे बंधन सारेच ''शब्दसम्राट'' इथे करिती सदैव मंथन हे शब्दतरू अन कवनपुष्प करतील तुमचे रंजन प्रिय वाचकहो करा येथ मधुमक्षिकेसम गुंजन तव मनोमनी मग पेटतील साहित्य स्फुरण-ज्योती स्मरतील तेव्हा केवळ ''शिंपल्यातले शब्दमोती''