*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹157
₹200
21% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
निरामय मानवी नातेसंबंधांची कल्पना करता येते? शोध चालूच आहे. अनेक पातळ्यांवरचे विरोधाभास सोसत वाटचाल चालू आहे. वाटचाल चालू आहे अजूनही हे महत्त्वाचं नाही? इतके उत्पात सोसूनही शोध चालू आहे हे? किती नकार पचवले किती वंचना आणि वर्चस्वांना नाकारले संघर्ष केले आणि तरीही आपण निरामय नातेसंबंधांची भाषा बोलतो. एकमेकांच्या सोबत राहण्याच्या अनिवार्यतेला नाकारत-स्वीकारत आपण अजूनही आशा करतो की मानवी नातेसंबंध सगळ्या दुःखातून मुक्त होतील. कधी स्वतःच्या मर्यादांचा तिरस्कार करत तर कधी दुसर्यांोच्या स्मृती-विस्मृतींना जोखत परजत पारखत स्वीकारत चालत राहतो. निखळ मैत्रीचे क्षण शोधण्याची आस मनात सांभाळत. व्यक्तिगत इतिहासावर या सगळ्याचे ताण जाणवत राहतात. मग लक्षात येतं की संपूर्ण मानववंश-संस्कृतीची मीमांसा आपल्या या शोधाच्या पाठीशी असायला लागेल निव्वळ एकट्या व्यक्तीचा इतिहास पुरेसा नसतो नातेसंबंधांच्या शोधात. इतिहास साहित्य कला संस्कृती राजकारण हे सगळे कारणीभूत असतात नात्यांच्या परिस्थितीला. तेव्हा निरामय नातेसंबंधांची भ्रांतिका बनवण्यापेक्षा सम्यक भानातून भविष्याकडे जाण्याची वाटचाल अधिक खात्रीशीर...