आजपर्यंत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनचरित्रावर अनेक उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती झालीआहे याचे कारणआहे शिवाजी राजांचे अष्टपैलू लोभसव्यक्तिमत्त्व. महाराजांनी जीवनभर सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठी विविधउपक्रम व योजनाराबविल्या आणि त्यासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित केले.त्यामुळे महाराज आजही त्यांच्या कार्यरूपाने जिवंतआहेत. त्यांचे संपूर्ण जीवनकार्य आजयुवा पिढीला नवचैतन्य व प्रेरणा देत आहे. युद्धकरून शत्रूला पराजितकरणे एवढे त्यांचे कार्यमर्यादित नव्हते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुरेसेसैन्यबल व युद्धसामुग्री जवळनसतानादेखील उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोगकरून अपुर्यासैन्यबलाच्या आधारावर आपले युध्दकौशल्य पणालालावून अगदी आश्चर्यकारकरित्या त्यांनी आपल्याशत्रूला नामोहरम करण्यात कमालीचे यश प्राप्त केले.त्यापैकी काही प्रसंग म्हणजेफत्तेखानाचा पराभव अफजलखानाचा वधपन्हाळ्याहून सुटका पावनखिंडीतील रणसंग्राम उंबरखिंडीत कारतलबखानाची कोंडीशाइस्ताखानावर छापा. या ऐतिहासिक घटनांच्या माध्यमातून महाराजांच्या युध्दकौशल्याचे दर्शनहोते. येथे महाराजांनी उपयोगकेलेल्या युद्धकौशल्याच्या विविध अंगांचा मागोवाघेतला आहे; परंतुयुध्दकौशल्याचा संबंध नसलेले प्रसंगयेथे दिलेले नाहीत.पहिल्या प्रकरणात शिवरायांच्या युद्धकौशल्याची पार्श्वभूमी विषद केली असूनत्यानंतरच्या प्रत्येक प्रकरणात महाराजांच्या विविध युद्धकौशल्यांचे रोमहर्षक ऐतिहासिक घटनांचे विवेचनकेले आहे. यामध्ये काहीघटनांची पुनरावृत्ती झालेली आहे. परंतुसविस्तर विवेचन करताना त्यागोष्टींची नितांत आवश्यकता वाटतअसलेने पुन्हा पुन्हाकाही घटना अपरिहार्यपणे आलेल्या आहेत.एका नवीन दृष्टिकोनातून महाराजांच्या अंगीअसलेल्या विविध युद्धकौशल्यांचा सूक्ष्मपणे शोधघेतला आहे. याशिवाय गनिमी-कावा युध्दकौशल्यांची वैशिष्ट्ये शिवरायांचा युद्धविषयक दृष्टिकोन व त्यांच्या कर्तृत्वाच्या विविध पैलूंचा अत्यंतबारकाईने आढावा घेतला आहे.अशा विविध अंगानीयुक्त असलेले हेऐतिहासिक शिवचरित्र शिवप्रेमी वाचकांच्या पसंतीस पात्र होईलयाची खात्री आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.