*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹130
Out Of Stock
All inclusive*
About The Book
Description
Author
शिवस्मृती... कलात्मक शब्दांजली...! कविता हा वांङमय आणि जीवनानुभूती यातील महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. सहज ओठांवर गुणगुणता येईल अशी शब्दकळा घेऊन कविता साकार होते. हीच कविता पुन्हा पुन्हा गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक वेळी ही कविता आगळावेगळा आनंद देऊन जाते. आपल्या जीवनातून शेती मातीतून अधिक प्रगल्भ अर्थवाही कविता होत असते. कविता स्वतः घडते आणि इतरांना घडवते .कविता रसिकांशी कवी मनाशी आणि त्याच्या जनकाशी सतत संवाद साधतच जन्माला येते. आनंदाच्या क्षणी आणि उदासवाण्या दुःख द प्रसंगात देखील कविता आपल्याला खूप काही देऊन जाते. कवी योगेश ताटे यांच्या शेतकरी कुटुंबातील वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आकारास आलेला हा प्रातिनिधिक कविता संग्रह शेतकरी समाजातल्या सस्त्री-पुरुषां पासून ते थेट कुठल्याही क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांपर्यंतजाणकारांपर्यंत सर्वांच्या काळजात घर करून राहील असाच आहे. कविता ही हृदयामध्ये घर करून राहते. कविने घेतलेल्या विविध अनुभूतींचा सहज सुंदर कल्पना व आविष्कार म्हणजे कविता .अर्थातच याला साहित्यिक मूल्यांची प्रासादीकशी जोड लावावीच लागते तेव्हाच कविता रसिकांच्या मनाचा ठाव घेते. कविता जितकी साधी सोपी सुबोध तितकी जास्त ती मनात रेंगाळत राहते. अशाच सहज सोप्या शब्दात आशयघन कवितां ह्या प्रातिनिधिक कविता संग्रहा मधून डोकावतात. सर्व कवितांमधून एक पारदर्शी प्रांजल आत्मिक अनुभूती जाणवते।