*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹228
₹290
21% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही. तर अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून शिवछत्रपतींच्या जीवनगाथेतून नेमकं आजच्या तरुण पिढीने काय शिकायचं? शिवाजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक युगात प्रॅक्टिकली कसे जगायचे? आपलं कुटुंबाचं आणि समाजाचं जीवन कसं समृद्ध करायचं? हा महामार्ग दाखवणारे एकमेवा द्वितीय क्रांतिकारी पुस्तक आहे. शिवबा ते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज ह्या जगाच्या पाठीवरील सर्वात यशस्वी जीवनप्रवासाची नेमकी अशी कोणती कालातीत सूत्र होती? प्रचंड संकटांशी दोन हात करून कसं उभं केलं शिवाजीराजांनी शून्यातून स्वराज्याचे विश्व? कसं होतं शिवरायांचे गड - किल्ल्याचे व्यवस्थापन? कसे झाले शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू? कसा होता शिवरायांच्या सकारात्मक दृष्टिकोन? स्वराज्याची राजमुद्रा म्हणजे मराठी माणसाचा अभिमान. नेमकं काय आहे या राजमुद्रेचे रहस्य? लेखकाविषयी : गेल्या तीन दशकापासून टेक्निकल क्षेत्रात कार्यरत असतांना महिंद्रा अँड महिंद्रा एबीबी जनरल मिल्स एच.ए.एल. यांसारख्या विविध नामांकित कंपन्यांमध्ये मेंटेनन्स विभागात काम केले. त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहून औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रिकल पॅनल बोर्ड निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास म्हणजे श्वास आणि ध्यास मानून मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा गेल्या बारा वर्षांपासून अखंडपणे सखोल अभ्यास करत आहेत. महापुरूषांच्या चरित्रातून आजच्या तरुण पिढीने नेमकं काय शिकायचं? ह्या विषयावर अनेक शाळा आणि महाविद्यालयात प्रेरणादायी व्याख्यान देऊन आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये महापुरुषांचे खरे विचार रुजविण्याचे काम योगेश क्षत्रिय अखंडपणे करीत आहेत.