Shreeharsh

About The Book

कोणत्याही लेखास खरे प्रमाणभूत आधार म्हटले म्हणजे शिलालेख ताम्रपट व त्या वेळच्या पुरुषाने लिहिलेले (इतिहास) विशेषेकरून ग्राह्य होत. श्रीहर्षराजाच्या निबंधास असेच आधार घेतले आहेत. मधुबन ताम्रपत्रलेख व बस्खेर ताम्रपत्रलेख असे हर्षराजाच्या वेळचे ताम्रपत्रलेख सापडले आहेत. त्या दोहोंत सारखाच मजकूर असल्यामुळे मधुबन ताप्रपत्रलेखच मराठी भाषांतरासह दिला आहे. हर्षाचे वंशजांस देवताप्रसाद त्यांची सत्कुलीनता सदाचारसंपन्नता व विद्वन्मान्य विद्वत्ता व हर्षाचे पराक्रमादी गुण कसे होते हेही यात चांगले दाखविले आहे. बाणाने दिलेल्या व ह्यु-एन-त्संगने दिलेल्या हर्षचरित्राचे मराठी संक्षिप्त भाषान्तर त्या दोन्ही हर्षचरित्रांतील व इतर प्रमाणभूत गोष्टी यांचेही आधार यास घेतले आहेत. हर्षाच्या कालनिर्णयासंबंधाने प्रमाणभूत असलेले शिलालेख व ह्यू-एन-त्संगचे प्रवासवृत्त हेही यात दिले आहेत. प्रसंगाने हर्षाचा प्रतिस्पर्धी दुसरा सत्याश्रय पुलकेशी याचे संक्षिप्त चरित्र हर्षबंधू सज्जनकृष्णराज याचे परोपकारकर्तृत्व आणि त्याच्या योगाने हर्षराजा व बाणादी कवी यांचा संयोग हर्षाचे दानशौडंत्व त्याचे सप्रमाण विद्वत्व व ग्रंथकर्तृत्व व बौद्ध धर्माकडे कल तसेच डॉ. हॉल यांच्या मताचे निराकरण आणि हर्षराजाच्या ग्रंथाचे यथामती व यथावकाश केलेले विवेचन इतक्या प्रकरणांचे विवेचन यात केले आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE