या पुस्तकात लेखिकेने भगवान कृष्णांचे अवतार-जीवन समग्रपणे सादर केले आहे. भागवत पुराण भगवद्गीता महाभारत आणि भारताच्या मौखिक परंपरांमधून लेखिकेने कृष्णांच्या जीवनातील अनेक घटनांचे वर्णन केले आहे. कृष्णांचा कारागृहातील जन्म वृंदावनातील त्यांचे लहानपणचे खट्याळ दिवस द्वारकेतील त्यांचा विलक्षण शासनकाळ आणि कुरुक्षेत्रावर झालेल्या महाभारत युद्धात वीर अर्जुनाचे गुरू आणि सारथ्याच्या भूमिकेतील त्यांचे शक्तिशाली रूप या त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या पुस्तकात कृष्ण कसे महायोगी झाले आणि त्यांनी स्वतः आणि प्रकृती दोन्हींवर कसे पूर्ण नियंत्रण स्थापित केले याविषयी सांगितले आहे. धाडसी बालक आणि महायोगी खोडकर प्रियकर आणि दैवी शासक यांच्या अद्भुत गुणांना या पुस्तकात समाविष्ट केले आहे. यातून लेखिकेने हे दाखवून दिले की कृष्णांच्या जीवनातील कथांमध्ये उत्कृष्ट साधेपणा व आनंदाची अभिव्यक्ती अशा काही प्रकारची होती की सर्व स्त्री-पुरुष स्त्री अथवा बालक भगवान कृष्णांच्या उपदेशांमध्ये लपलेले ज्ञान आत्मसात करू शकतील.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.