'केईएम' रुग्णालयात काम करत असताना डॉ. अविनाश सुपे यांनी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना गोष्टी किंवा गप्पांमधून उलगडून दाखवलेली अनुभवांची शिदोरी... म्हणजे 'श्वास-विश्वास' हे पुस्तक! हे अनुभव गोष्टीच्या स्वरूपात, तत्कालीन असले, तरी ते आपल्याला विचार करायला लावतात. या प्रत्येक गोष्टींच्या पलीकडे जाऊन 'आरोग्यसेवा' व 'रुग्णसेवा' कशी सुधारता येईल, त्यामध्ये समाज म्हणून आपण काय योगदान करू शकतो, याचा विचार आपण केला पाहिजे. हाच पुस्तकाचा उद्देश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पारंपरिक ज्ञानाबरोबरच त्यातील बदलांचा, तंत्रज्ञानाचा साक्षीदार म्हणजे हे पुस्तक! डॉक्टर-रुग्ण यांचा संवाद, नाते कसे सुधारेल याविषयी मार्गदर्शन! रुग्ण, डॉक्टर, नवोदित डॉक्टर, समाजातील सर्व वयोगटातील आणि स्तरांतील लोकांसाठी उपयुक्त! लेखकाविषयी माहिती : डॉ. अविनाश सुपे यांनी एमएस, एफआरसीएस पदवी संपादन केली आहे. माजी संचालक आणि डीन म्हणून त्यांनी 'केईएम' तसेच वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये, Mcgm, मुंबई काम केले आहे. जठरांत्र शल्यचिकित्सा आणि वैद्यकीय शिक्षण, सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई, येथे मानद प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत आहेत. भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार 'डॉक्टर बी. सी. रॉय पुरस्कार', तसेच Medical Council Of India, National Board Of Examinations, Maharashtra Medical Council, Anbai, Maharashtra University Of Health Sciences (Muhs), Faimer या सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे उत्कृष्ट शिक्षक व डॉक्टर म्हणून पुरस्कार यांना मिळाले आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ६३ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. १२६ वेळा स्वैच्छिक रक्तदान केल्याबद्दल भारतीय सरकारतर्फे Centurion Donar पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे.