*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹450
₹500
10% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
दिग्दर्शक राही बर्वे हे नाव ‘तुंबाड’या त्यांच्या बहुचर्चित सिनेमामुळे सर्वांना परिचयाचे झाले आहे. राही यांचा ‘तुंबाड’हा सिनेमा अनेकविध कारणांसाठी लोकप्रिय ठरला. आंतरराष्ट्रीय सिनेस्तरावरही या भारतीय सिनेमाची दखल घेतली जाऊन तो वाखाणला गेला.परंतु जितका भव्यदिव्यतेने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर पडद्यावर साकारला गेला तितकाच; किंबहुना त्याहूनही कितीतरी पटींनी जास्त तो बनण्याचा प्रवास हा क्लिष्ट होता. केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही राही यांच्या धीर-संयम-चिकाटी या सर्वांचाच अंत पाहणारा होता. एकीकडे सिनेमा बनवण्याच्या खटपटी तर दुसरीकडे आपल्या आईचे असाध्य आजारपण. शारीरिक-भावनिक-बौद्धिक अशा सर्वच स्तरांवर थकवणारा राही यांचा हा समांतर प्रवास तेव्हा सुरू होता.'श्वासपाने'मध्ये राही यांनी त्यांचा हा सबंध प्रवासच अत्यंत प्रवाहीपणे लिहिला आहे. पुस्तकाची पाने ही जणू त्यांचा हा प्रवासच श्वासणारी असावीत. सौमित्र यांनी म्हटल्याप्रमाणे `श्वासपाने’ वाचता वाचता आपण अनेक सिनेमे अनेक व्यक्तिरेखा अनेक पुस्तकं अनेक आठवणी अनेक कोट्स अनेक घटनांनी झिगझॅग फिरत राहतो.’ अशा वेळी या झिगझॅगमध्ये आपण कितीही घुसमटलो गुदमरलो घाबरलो तरी ‘श्वासपाने’वाचणं हा एक सर्जनशील अनुभव आहे हे निश्चित.