*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹195
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
भयाचा शत्रू तुमचा मित्र Power of Symbology मनुष्याचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे भय आणि भयाचा शत्रू साहस! ‘आपल्या शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो’ हे तर आपल्याला माहीत आहेच. या उक्तीनुसार साहस तर आपला मित्र झाला आणि हा मित्रच मनुष्याच्या आत दडलेल्या भयरूपी शत्रूचा नाश करतो. भयामुळे मनुष्य जुन्या मार्गानेच वाटचाल करण्यासाठी विवश होतो. भय नवीन मार्ग अनुसरून नवनिर्माण करण्याचा उत्साह नष्ट करतं. मात्र साहसाने मनुष्याच्या नसानसांत ऊर्जा आणि स्फूर्ती यांचा संचार होतो. प्रस्तुत पुस्तकात साहसी सिंदबादच्या सात सफरींच्या माध्यमातून साहस हा गुण विकसित कसा करायचा याचं सूत्र दिलं आहे. उत्साह सजगता आणि निःस्वार्थ भावना हेच सिद्ध करते भीती नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्त्वात नाही. सिंदबादची कथा आणि पुस्तकात दिलेली प्रतीक विद्या (Power of Symbology) तुम्हाला पुढील बोध देईल- * जुन्या सवयी आणि विचारांचं विसर्जन * सत्यमार्गावर वाटचाल करत मेंदूमध्ये नवीन रस्ते (विचार) निर्माण करणं * अंतर्मनाबरोबर नवीन करार करणं * आपली मौलिकता जाणणं * एकाग्रतेचं प्रशिक्षण प्राप्त करणं * मूळ विचारांमध्ये परिवर्तन घडवणं * वेळ क्षेत्र आणि वैयक्तिक सत्य यांपलीकडे असलेलं शाश्वत सत्य जाणणं. चला तर मग आता भय कशाचं पहिलं पान उघडू या. . . !