साहस व्यापार वसाहतवाद औद्योगिक क्रांती आणि युद्धे...मानव जातीने पाचशे वर्ष जगात धुमाकूळ घातलाजगात अभूतपूर्व कोलाहल माजलासमुद्रमंथन सुरू झालेजुने ग्रामीण जीवन नष्ट झालेनव्या नागरसृष्टीच्या उदयाची चाहूल लागलीपरंतु मानवाच्या अर्थसृष्टीने निसर्गाचे अस्तित्व धोक्यात आणलेशाश्वत समृद्ध सुंदर शांततामय जग घडविण्याची धडपड सुरू झालीअर्थसृष्टी नागरसृष्टी आणि निसर्गसृष्टीचे नाते संबंध समजून घेत तीन सृष्टीची सांगड घालण्याची दृष्टी अत्यावश्यक झालीसिंगापूरने शाश्वत विकासाचा मार्ग शोधलात्याचा हा सिंगापूरनामा