गीतारामायणकार मराठीचे वाल्मीकी पद्मश्री कथा चित्रकथा नाटक कांदबरी आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते भक्तिगीते सवाल-जवाबांची ठसकेदार रचना निर्भर शृंगाराच्या लावणीरचना निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते गंगाकाठी कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक भावसंपन्न मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक देशभक्त कवी कथाकार नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र व्यक्तिचित्र ललितलेख लघुकथा दीर्घकथा प्रवासवर्णन चित्रपटकथा काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे हे निश्चित!
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.