प्रसूतीनंतर स्तनपान ही निसर्गाची अमूल्य ठेव! पण प्रगत राष्ट्रांची नक्कल केल्यामुळे काही सुशिक्षित वर्गांमध्ये स्तनपानाचे प्रमाण कमी झाले. जरी अलीकडे स्तनपानाचे प्रमाण वाढत असले तरी त्याबाबतचे गैरसमज शंका-कुशंका आणि अडचणी या सर्व गोष्टी स्तनपान योग्य प्रकारे करण्यास आड येतात आणि त्यात भर पडते ती माहिती नसणार्यांची भिन्न मतं! अशा वेळी अनुभवी तज्ज्ञांची आवश्यकता भासते की ज्यांच्याकडून योग्य तो सल्ला उपलब्ध होऊन आनंददायी स्तनपान करण्यात मदत होईल. या पुस्तकात सर्व प्रकारची माहिती जितकी थोडक्यात नमूद करता येईल तितकी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत विषय मांडण्याची कला डॉ. प्रभूदेसाईंना अवगत असल्यामुळे वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल आणि योग्य प्रकारे स्तनपान करण्यास मार्गदर्शन करेल. योग्य प्रकारे स्तनपान केल्याचा फायदा बाळाला पूर्ण आयुष्यात उपयोगी पडतो आणि त्याची तयारी गरोदरपणीच करणे जरुरीचे असते. हे पुस्तक डोहाळे जेवणाच्या वेळी गरोदर महिलेला भेट म्हणून देण्याजोगे आहे. या पुस्तकाचा उपयोग सर्व वर्गांतल्या स्त्रियांना व्हावा हीच डॉक्टरांची आणि माझी इच्छा आहे. - डॉ. यशवंत आमडेकरबालरोगतज्ज्ञ माजी प्राध्यापकजे. जे. हॉस्पिटल आणि ग्रॅट मेडिकल कॉलेज मुंबई
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.