*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹170
₹200
15% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
समाज हे कुटुंबाचे व्यापक स्वरूप आणि कुटुंबाचं सार म्हणजे स्त्री. अनादिकाळापासून हे सत्य मानले गेले. तसेच हेही सत्य आहे की या ‘सत्याची’ सत्यता टिकवून धरण्यासाठी स्त्रीच एकांगी झिजली झटली लुटली गेली. मात्र आता ती पुरातन जाचक रूढींवर मात करत उभी राहते आहे. स्वत:च्या समस्या सोडवण्यासाठी तिने प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न केले. आत्मविकासाकडे तिचा प्रवास हळूहळू पण नक्की होत गेला आणि अजूनही होत आहे. तिचं स्त्रीत्व तिचं माणूसपण याचे खरे संदर्भ शोधण्याची तिची धडपड आजही चालू आहे. त्या आजच्या स्त्रीचा प्रवास; माणूसपण वैवाहिक जीवन आणि व्यक्तिमत्त्वविकास या तीन पातळ्यांवर लेखिकेला महत्त्वाचा वाटतो. तिचा हा प्रवास तिच्या जीवनातले हे परिवर्तन छोट्या छोट्या उदाहरणांनी सोप्या आणि संवादी भाषेत जेथे उलगडले ते हे स्त्रीसूक्त.