संस्कृत वाड.मयात सुभाषितांचे फार मोठे भांडार आहे. या सुभाषितांत शिकडो पिढ्यांचे शहाणपण साठवलेले असते. सुभाषितांसारखे रत्नखचित दालन इतर भाषांतून आढळत नाही. परंतु विद्यार्थी जगात या सुभाषितांची ओळख असायला पाहिजे तेवढी नाही. म्हणूनच ह्या छोट्या पुस्तकात ३७ सुभाषिते निवडून त्यावर आधारित अशा ३७ कथा दिल्या आहेत.