*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹219
₹240
8% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि विदेशी भांडवल भारतात यावे या उद्देशाने केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यांची पुनर्रचना केली आहे. हे कामगार कायदे नेमके काय आहेत. यांची विस्तृत आणि सोपी मांडणी म्हणजे लेखक संजय सुखटणकर यांचे सुधारित कामगार कायदे हे पुस्तक. औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये व्यवस्थापन आणि कामगार या दोघांनाही समान न्याय मिळणे हा एक घटक आहे. सरकारने कामगार कायद्यांचा अभ्यास करून त्यात काय सुधारणा कराव्यात याबाबत केलेल्या शिफारसींचा संक्षिप्त आढावा कायद्यांद्वारे यामध्ये घेतला आहे. सरकारने सध्याच्या कामगार कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या आणि काही कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन कामगार कायदे तयार केले त्याचे हे विवेचन! इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड (२०२०) कोड ऑन वेजेस (२०१९) ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड (२०२०) कोड ऑन सोशल सिक्युरिटी (२०२०) हे कायदे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाविषयी : लेखक संजय सुखटणकर हे पुणे विद्यापीठाच्या शास्त्र कायदा आणि बिझिनेस मॅनेजमेंट या विषयांचे पदवीधर आहेत. प्रीमियर ऑटोमोबाइल्स जॉन्सन अँड जॉन्सन क्रॉम्प्टन ग्रीव्हज् सीबा-गायगी स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि ज्युबिलंट या नामवंत कंपन्यांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले. सेंचुरी एन्का या कंपनीतून उपाध्यक्ष म्हणून ते निवृत्त झाले. सकाळ व अन्य मराठी वृत्तपत्रांमध्ये ‘कामगार कायदा’ याविषयावर विपुल लेखन केले आहे. ‘कामगार कायदे’ ‘मॅनेजमेंट माफिया’ ही कादंबरी त्याशिवाय इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि लेबर लॉ या दोन विषयांवर त्यांनी मार्गदर्शनपर पुस्तके लिहिली आहेत.