*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹175
Out Of Stock
All inclusive*
About The Book
Description
Author
सुखी जीवनाची आठ सूत्रं मनुष्य स्वतःचं जीवन चुकीच्या सवयी आणि नकारात्मक विचारांमुळे गुंतागुंतीचं आणि बिकट बनवतो. मग बंधनांतून मुक्त होऊन स्वातंत्र्य प्राप्त करणं ही तर त्याच्यासाठी खूपच दूरची गोष्ट ठरते. उलट तो स्वतःच बनवलेल्या दुःखरूपी जाळ्यात जीवन जगायला विवश होतो. शांती आणि संतुष्टी यांच्यापासून तो दुरावला जातो. याउलट मनुष्य जेव्हा सुखी जीवनाची सूत्रं पासवर्ड समजून घेतो तेव्हा तो खर्या अर्थानं सुखी आणि संपन्न जीवनाचं महाद्वार उघडतो. प्रस्तुत पुस्तकात सुखी जीवनाचे आठ पासवर्ड दिले आहेत. त्यांच्या साहाय्याने आपण दुःख आणि अशांतीचं लॉकर खोलू शकाल. वरवर पाहिलं तर हे आठ पासवर्ड तुम्हाला अगदी सामान्य वाटतील. परंतु दैनंदिन जीवनात यांचा उपयोग केला तर शांती आणि संतुष्टी यांचा तुमच्यावर वर्षाव होईल. तुमचं जीवन बहरून जाईल. या पुस्तकात दिलेल्या काही महत्त्वपूर्ण भागांवर प्रकाश टाकू या- * सफल सुखी जीवनाचे पासवर्ड कसे प्राप्त कराल * भावनांच्या गुहेतून मार्गक्रमण कसं कराल * कमतरता अभाव यांचं उच्चारण करू नका * भ्रमरूपी जाळ्यातून बाहेर कसं पडाल * दुःखाकडे आनंदित नजरेने कसं पाहाल * शेजार्याचं सुख तुमचं दुःख बनू देऊ नका * दुःखाचं दुःख करणं बंद कसं कराल * सहकार्याकडून बोध कसे शिकाल