अनेकदा आपल्याला असे प्रश्न पडतात की ज्यांची उत्तरे भेटणे किंवा शोधणे खुप कठीण होऊन बसते. मग आपण त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतो. परंतु काही कारणाने त्या प्रश्नांची उत्तरे सापडणे फारच कठीण होऊन जाते. कारण मानवी मस्तिष्क ज्या विचाराने तो प्रश्न आपल्या विचारात आणतो की त्या प्रश्नाला कसे सगळ्यांसमोर मांडावे किंवा कश्याप्रकारे लिहून काढावे हे फारच कठीण काम होऊन जाते आणि जर हे असे प्रश्न कोणाला विचारले तर झालेच लोक आपली मस्करी उडवायला मोकळे. कारण प्रत्येकाची विचार करण्याची किंवा दुसऱ्यांचे विचार किंवा प्रश्न समजून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते आणि मानवी मस्तिष्क हा फारच जटील अवयव मानला जातो. कारण व्यक्ती कोणत्या प्रकारे विचार करतो किंवा त्या व्यक्तीला कोणते प्रश्न पडतात याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. माझ्यासोबत देखील हेच होत असे मला जे प्रश्न पडायचे त्यांची उत्तरे मी माझ्या वर्गशिक्षक मित्रांना किंवा मला जे लोक सुशिक्षित वाटायचे त्यांना विचारत असे तेव्हा ते पूर्णपणे गोंधळात पडायचे. कारण ज्या विषयांवर मी त्यांना प्रश्न विचारत असे ते पूर्णपणे पुस्तकाबाहेरचे असायचे ज्याचा त्या लोकांनी कधीही अभ्यास केलेला नसायचा. मग ते मला उद्या सांगतो परवा सांगतो असे म्हणून मला टाळायचे. मला वेडा आहेस का ? असे काहीही नसते तू खुप विचार करतोस म्हणून तुला असे प्रश्न पडतात असे उत्तर मला त्यांच्याकडून भेटायचे. मग मी ठरवले की मी एक असे पुस्तक लिहिणार ज्यामध्ये असेच प्रश्न असतील आणि जे माझ्यासोबत होत आहे ते दुसऱ्या कोणासोबतही होऊ नये. म्हणून हे पुस्तक मी लिहीले आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.