*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹229
₹300
23% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
भविष्यात नोकर्]यांची उपलब्धता कमी कमी होणार आहे मात्र स्वतंत्र कामे वाढत जाणार आहेत. त्यात नावीन्याची भर पडत राहणार आहे. नोकरी आणि नोकरीची हमी ही आपली मानसिकता बदलणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. कायमस्वरूपी नोकरीकडून स्वतंत्र काम या महत्त्वाच्या स्थित्यंतराला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात याला घाबरण्याचे कारण नाही. आपण स्वत ला कमी लेखू नका. आपण हुशार आहोत कल्पकही आहोत या गोष्टीवर विश्वास ठेवा. अनेक संधी आपली दारे ठोठावत आहेत. त्याचे रूपांतर आपण आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी करू शकतो. आपण जे होऊ शकतो असे आपल्याला वाटतं तसं होण्यासाठी आपल्याला कुणीतरी स्फूर्तीदायी व्यक्ती असणं ही काळाची गरज आहे. उद्योग म्हणजे साहस मोठा उद्योग म्हणजे मोठे साहस. मनातील जिद्द अमर्याद कष्ट करण्याची कुवत धोका आणि जबाबदारी पत्करण्याची तयारी आणि व्यवहारी चतुरपणा असल्याशिवाय ही साहसे यशस्वी तरी कशी होणार ? आपल्यात यासाठी योग्य अशी मनोधारणा आणि धैर्य निर्माण करण्यास या पुस्तकातील संकल्पनांचा आणि यात चित्रित केलेल्या आदर्श उद्योगपतीच्या जीवनचरित्रांचा घेतलेला परामर्श आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.