या जगातील ८० टक्के लोक सामान्य आणि स्वतःच्या मर्जीविरुद्ध जीवन जगतात तर फक्त २० टक्के लोक आपल्या मनाप्रमाणे स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगतात. जगातील ८० टक्के संपत्ती फक्त २० टक्के लोकांच्या हातात सामावलेली आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की या आनंदी कर्तृत्ववान यशस्वी अशा या २० टक्के लोकांमध्ये आपण का नाही? या २० टक्के लोकांना स्वयंविकास कसा करावा प्रेरित कसे राहावे हे समजलेले असते. स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा कशी ज्वलंत ठेवावी हे त्यांना माहीत असते. हे जे या २० टक्के लोकांना कळले उमजले समजले तेच या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे हे वेगवेगळ्या अनुभवांतून उदाहरणांतून प्रसंगांतून आणि कथांतून या पुस्तकात सांगितले आहे. निखळ व्यक्तिमत्व विकासावर केंद्रित न करता संपूर्ण संर्वांगीण मानवी स्वयंविकासावर या पुस्तकात भाष्य केले आहे. लेखकाविषयी : विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव ह्या क्षेत्रात आहे. मोठमोठया भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केलेले आहे. ते सध्या एपी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपमध्ये ग्रुप डायरेक्टर-एचआर म्हणून काम करतआहेत. व्यवस्थापन जर्नल्स आणि मासिकांमध्ये ते नियमितपणे लिहितात. ते बॉम्बे मॅनेजमेंटअसोसिएशन एनआयपीएम आणि एनएचआरडीचे आजीवन सदस्य आणि वेगवेगळ्या मंचांवर नियमित वक्तेआहेत. ते इंग्रजी आणि मराठी दैनिके आणि मासिकांमध्ये नियमित स्तंभलेखकही आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.