*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹248
₹375
34% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘तपोनिधी’ या पुस्तकात मराठी साहित्यक्षेत्रात काम करणाऱ्या चोवीस संशोधकांचे संशोधन कार्य आणि त्या संदर्भातील त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा सांगोपांग वेध घेतला आहे. आधुनिक पाठचिकित्सा शास्त्राचे प्रवर्तक आणि मूलगामी संशोधक प्रा. अनंत काकबा प्रियोळकर यांच्या नावे मुंबई विद्यापीठातर्फे दिला जाणारा पुरस्कार मिळालेले हे सगळे मराठी साहित्यविश्वातले महत्त्वाचे संशोधक आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच डॉ. सु. म. तडकोडकर यांनी प्रा. प्रियोळकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा परिचयात्मक लेख महत्त्वाचा आहे. त्यानंतर गेल्या चोवीस वर्षांत हा पुरस्कार मिळवणारे डॉ. दु. का. संत महानुभावीय वाङ्मयाच्या गूढ लिपीवर संशोधन करून ते साहित्य प्रकाशात आणणारे डॉ. वि. भि. कोलते भाषिक विशिष्टतेचा आग्रह आणि वाङ्मयेतिहासलेखन हा महत्त्वाचा मुद्दा मांडणारे डॉ. श्री. रं. कुलकर्णी लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे लोकसाहित्याच्या अभ्यासात आयुष्य वेचणारे डॉ. गंगाधर मोरजे समन्वयशील संशोधक डॉ. वि. रा. करंदीकर भाषा आणि वाङ्मयाच्या ऐतिहासिकतेचा शोध घेणारे डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये संहितानिश्चितीचा अखंड ध्यास घेणारे डॉ. म. रा. जोशी मराठी समीक्षेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारे डॉ. म. वा. धोंड समाजक्रांतीचे सिद्धांतन करणारे कॉ. शरद पाटील समीक्षक गुरू प्रा. गंगाधर पाटील प्रा. मा. ना. आचार्य चरित्रकार संशोधक डॉ. गो. मा. पवार सूचीकर संपादक आणि समीक्षक डॉ. स. रा. चुनेकर व्यासंगी संशोधक आणि साक्षेपी लेखक डॉ. अरुण टिकेकर रसिकाभिमुख समीक्षेचा ध्यास असलेल्या डॉ. विजया राजाध्यक्ष निष्ठापूर्वक लेखनसंशोधनाची अखंड साधना करणारे डॉ. यु. म. पठाण स्त्रीवादी दृष्टिकोनातून लोकसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या तारा भवाळकर संशोधनपर लेखनाची स्वतंत्र आणि वेगळी पठडी निर्माण करणाऱ्या अरुणा ढेरे प्रकल्पकार्यात मग्न असणारे प्रा. रा. सहा. नगरकर कवित्वशोधाची अखंड तृष्णा असणारे डॉ. म. सु. पाटील जुन्यानव्या साहित्यसंशोधनात रमलेल्या डॉ. उषा देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय ‘तपोनिधी’ या पुस्तकातून होतो.