पुस्तकात नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक- युवतींना योग्य मार्गदर्शन करुन प्रेरणा देण्याच्या उद्देशाने विचार प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. स्वतःला ओळखा जिद्द चिकाटी व प्रयत्न यश अपयश परिश्रम संघर्ष संयम सकारात्मक दृष्टीकोन आत्मविश्वास इच्छाशक्ती निश्चय दूरदृष्टी इ. विषयांचे प्रस्तुत पुस्तकात सविस्तर विवेचन केलेले असून न्यूनगंडाची भावना झटकून टाकण्यासाठी यथोचित मार्गदर्शन केलेले आहे. तसेच आपल्याजवळ असलेल्या शब्दसंपतीचा विचारपूर्वक उपयोग करुन आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मानसिकदृष्टया जिंकण्याचा सल्ला दिलेला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी जर या पुस्तकाचे मन:पुर्वक वाचन करुन विचारांचा अंगिकार केला तर यश मिळविणे सुलभ होईल याची खात्री आहे.