THE CASE OF THE DEMURE DEFENDENT


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

Is the King of American mystery fiction. A criminal lawyer he filled his mystery masterpieces with intricate fascinating ever twisting plots. Experts have searched for holes in his logic and found it perfect. No wonder mystery fans have made him the 1 best selling writer of all time. नादिन फार ही तरुणी आपल्या मनोविश्लेषकाला टेपरेकॉर्डवर टेप केलेल्या ट्रूथ सेरम चाचणीमध्ये सांगते की तिने मोशेल हिग्ले या मानलेल्या काकाला विष देऊन मारले आहे. वैद्यकीय तपासानुसार मोशेर हिग्लेचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झालेला आहे. नादिन व मोशेर हे एकमेकांना अजिबात आवडत नाहीत. कोणत्यातरी अटळ परिस्थितीमुळे दोघे एका घरात राहत आहेत. मोशेरची देखभाल नादिनच करत असल्याने त्याच्या मृत्यूला तीच कारणीभूत असल्याचे सकृद्दर्शनी वाटते आहे. त्यातच ट्रूथ सेरम चाचणीतही नादिन तसे सांगत आहे. नादिन ही तिच्या आईला- रोझ फारला लग्नाआधीच झालेली मुलगी आहे. तिचा बाप कोण हे मात्र गूढ आहे. काही कारणांनी अनिच्छेनेच ती मोशेलजवळ राहत होती व त्यानेही नाखुशीनेच तिला आपल्याजवळ ठेवले होते. मोशेलच्या धंद्यातील भागीदारानेही अचानक आत्महत्या केली आहे; परंतु ती आत्महत्याच होती की खून होता? लॉकी कुटुंब मोशेरचे मित्र होते. त्यातील जॉन व नादिनमध्ये निर्माण झालेले प्रेमसंबंध मोशेरला पसंत नव्हते. त्याने नादिनला जॉनपासून लांब जायला सांगितले होते. याचाही राग नादिनच्या मनात होताच. नादिन १८वर्षांची होताच तिला देण्यासाठी तिच्या आईने एक पत्र बँकेत ठेवले होते. त्यात कोणत्या रहस्याचा उलगडा होता की ज्यामुळे नादिन मोशेरला धमक्या देत होती? त्यातच मोशेरची पुतणी स्यू न्यूबर्न व तिचा नवरा जॅक्सन न्यूबर्न यांचाही मोशेरच्या खुनात सहभाग होता का असाही एक संशय होता; कारण मोशेलच्या मृत्यूनंतर त्यांचाही संपत्तीत वाटा होता. नादिन जॅक्सनला तिच्याकडे ओढून घेत आहे असे स्यूला वाटत होते. त्यामुळे ती नादिनचा द्वेष करत होती. तसेच मोशेलच्या संपत्तीत नादिनचाही वाटा आहे असे तिला वाटत होते. कोणी मारले मोशेलला? की मोशेलला खरेच नैसर्गिक मृत्यू आला?
downArrow

Details