सर्वंकष जीवनशैलीमध्ये डाएटचं महत्त्व सहसा लक्षात येत नाही. निरोगी जीवनशैलीला साहाय्यभूत असणाऱ्या विविध घटकांबद्दल या पुस्तकात माहिती मिळते. हा प्रत्येक घटक अनोखा आहे. आतड्यापासून सुरुवात होऊन आजच्या जगात बोलबाला असणाऱ्या सुपर फूडपर्यंत सारं काही या पुस्तकातून समोर येतं. व्यवहार्य तंत्र आणि सहज तपासता येण्यासारख्या याद्यांकडे आवर्जून लक्ष द्या. वाचकांच्या विविध जीवनशैलीला अनुसरून लेखिकेने जे 101 आहार आराखडे दिले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. मनःसामर्थ्यावर विश्वास असल्याने लेखिकेने ‘ध्यानधारणा आणि प्राणायाम यासाठी स्वतंत्र प्रकरण दिलं आहे. आहार पोषण तंदुरुस्ती मनाचं आरोग्य आणि एकंदरीतच जीवनशैलीत झालेले बदल या विविध क्षेत्रांत प्राप्त केलेल्या आपल्या दशकभराच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ डॉ. पाटील या पुस्तकातून आपल्यालाही करून देतात.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.