*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹244
₹320
23% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
ही गोष्ट आहे रुख्साना नावाच्या तरुण पत्रकार मुलीची. काबुलमध्ये राहते. घरी कॅन्सरने आजारी म्हातारी आई आणि जहान नावाचा लहान भाऊ. तिचे आजोबा आणि वडील तालिबानने पेरलेल्या एका भूसुरुंगाच्या स्फोटात मारले गेलेले आहेत. या रुख्सानाला आपली नोकरी तालिबानच्या दादागिरीमुळे सोडावी लागली आहे. कारण ‘स्त्रिया फक्त दोनच ठिकाणी असाव्यात- घर किंवा कबर’ असं तालिबानचं मत आहे. स्त्रियांना एकटं घराबाहेर पडण्याची मुभा नाही. घरातली पुरुष व्यक्ती सोबत असायलाच हवी. नाहीतर फटके किंवा मृत्युदंड. अशा परिस्थितीत रुख्साना लपूनछपून भारतीय वर्तमानपत्रासाठी बातम्या पाठवते. या सगळ्यात एक दिवस तिला बोलावणं येतं ते सरकारच्या ‘प्रपोगेशन ऑफ व्हच्र्यू अँड द प्रीव्हेन्शन ऑफ व्हाइस’मंत्रालयाकडून. हे खातं सगळ्यांवर लक्ष ठेवतं की लोकं धर्माचं आणि तालिबानच्या आदेशांचं नीट पालन करतात का यावर. घाबरलेली रुख्साना तिथे जाते. तिथे तिला तालिबानच्या क्रौर्याचं दर्शन घडतंच. पण सोबतच तालिबानचा कमांडर झोराक वाहिदी घोषणा करतो अफगाणिस्तानात क्रिकेट सामने भरवण्याची. अर्थातच फक्त पुरुषांसाठी. टीम तयार करण्याची मुभा सर्वांना आहे. यात जिंकणारी टीम पुढच्या कोचिंगसाठी पाकिस्तानात जाणार आणि जगभरात अफगाणिस्तानाचं नेतृत्व करणार. यात झोराक वाहिदीमुळे रुख्सानाला नोकरी करता येत नाहीये. तालिबानची क्रिकेट खेळवण्याची घोषणा सगळ्या तरुणांमध्ये औत्सुक्याचा विषय आहे. कारण हा खेळ अफगाणिस्तानासाठी नवा आहे. रुख्सानाचा भाऊ जहान आणि इतर चुलत भावंडांना ही देशातून बाहेर पळून जाण्याची संधी वाटतेय. तर रुख्सानाचे लग्न ठरलेय सध्या अमेरिकत असलेल्या शाहीनशी. शाहीन आपल्यासाठी पैसे पाठवेल आणि आपण इथून निघून जाऊ या आशेवर ती आहे. रुख्सानाने दिल्लीत राहून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेय. आणि त्या वेळी ती टीमसाठी क्रिकेट खेळलेली आहे. आता ती जबाबदारी घेते आपल्या भावंडांना क्रिकेट शिकवण्याची. पण बुरखा घालून क्रिकेट कसे खेळणार आणि एक स्त्री मुलांना क्रिकेट खेळायला शिकवतेय हे तालिबानला कसे चालणार. शिवाय क्रिकेट पुन्हा खेळण्यामध्ये आणखीन एक अडचण आहे. याच क्रिकेटसोबत तिच्या दिल्लीतल्या हळव्या आठवणी जोडलेल्या आहेत. तिचं दिल्लीतलं मुक्त जीवन आई-बाबांसोबतच मोकळे क्षण दिल्लीतल्या नर्गिससारख्या मैत्रिणी आणि सगळ्यांपासून तिने लपवून ठेवलेले तिचे वीरसोबतचे प्रेमाचे नाते. या सगळ्या आठवणी पुन्हा क्रिकेटमुळे वर येणार आहेत. पण तिच्या भावंडांकडे तिच्याशिवाय दुसरा कोणीही क्रिकेट कोच नाही एकीकडे रुख्साना घराच्या अंगणातच भावांना क्रिकेट खेळायला शिकवतेय. आईची तब्येत खालावत चालली आहे. तर दुसरीकडे शाहीनकडे आता अमेरिका प्रवासासाठी पैसे मागायची वेळ आलेली आहे. कारण क्रिकेट मॅच जिंकून जहान देशाबाहेर जाण्याचा पर्याय आहे. त्याच वेळी किंवा त्याआधी रुख्सानाने पलायन करणे गरजेचे आहे. एके रात्री दिल्लीच्या जुन्या वस्तूंच्या पेटीत नाटकासाठी वापरलेली दाढी तिला सापडलीय. ती लावून जहानचे कपडे घालून ती मुलासारखी एकटीच बाहेर पडते. तिचा मागोवा लागलेला जहान दबक्या पावलांनी तिच्या मागोमाग जातो. पारतंत्र्यातही स्वातंत्र्याचे काही क्षण अनुभवण्याचा एक मार्ग आपल्याला सापडलाय असं रुख्सानाला वाटत असतानाच हेच सोंग तिची नवी कैद ठरणार आहे. जहान आणि ती परत येतानाच घराबाहेर धर्मरक्षकांची गाडी दिसते. झोराक वाहिदीचा भाऊ – ड्रून आपल्या भावासाठी जहानकडे रुख्सानाला मागणी घालतो. लग्न केलं नाही तर तिला उचलून नेऊ आणि तुला आणि तुझ्या आईला भयंकर शिक्षा देऊ अशी धमकीही देऊन जातो. सुदैवाने हे सगळं होताना मुलाच्या वेषातल्या रुख्सानाला कोणीही ओळखत नाही ती चुलत भावाच्या लग्नासाठी दुसNया शहरात काकांकडे गेलीय असं जहानने खोटंच सांगितलंय. आणि आता असंच मुलाच्या रूपात – बाबर बनून राहणं रुख्सानाला भाग आहे. तालिबानची घरावर पाळत आहे आणि घरात मुलगी दिसणं धोक्याचं आहे. या नाटकात आता अख्खी क्रिकेट टीम सामील आहे आणि रुख्साना बाबर बनून त्यांना क्रिकेट शिकवतेय. मुलासारखं कसं चालायचं बोलायचं हे टीम तिला शिकवतेय. तिची जुनी ब्युटी पार्लरवाली तिला चांगली नवी दाढी करून देते मुलगा दिसण्याासाठी मेकअप करायला शिकवते. आता तिला आशा आहे शाहीनच्या पत्राची. पण शाहीनने अमेरिकेत परस्पर लग्न केलंय. तसं तो पत्रातून कळवतो आणि रुख्सानाच्या आशा कोलमडतात. एकीकडे टीमला मॅच जिंकून बाहेर जाण्याची आशा आहे. पण रुख्सानाचं काय... वीरवर तिचं अजूनही प्रेम आहे आणि म्हणूनच तिने शाहीनसोबतचं लग्न दोनदा टाळलेलं आहे. याचाच शाहीनलाही राग आहे. आता ती पुन्हा वीरला कसाबसा संपर्क करते. दुर्दैवाने रुख्साना – जहानच्या आईचा आजार बळावतो आणि तिचं निधन होतं. आता आईच्या पुढच्या विधींसाठी तरी मुलगी परत येणारच याची तालिबान्यांना खात्री आहे आणि म्हणूनच ते अधिक दक्ष आहेत. रुख्साना घराच्या एका गुप्त खोलीत लपून स्वतचा बचाव करतेय. तिने बाबर म्हणून बाहेर पडणंही धोक्याचं आहे. यातच वीर कसाबसा काबुलला रुख्सानाच्या घरी पोहोचतो. आई जायच्या आधी रुख्सानाने हे गुपित तिला सांगितलें आहे आणि आईने जहानला सांगितलंय. जहान बहिणीचं लग्न वीरसोबत करायचं मान्य करतो पण एका अटीवर. ते म्हणजे त्याने टीममध्ये क्रिकेट खेळावं. टीम जिंकली तर ट्रेनिंगला जाईल. हरली तर वीरसोबत सीमेपार पलायन करेल. कारण सगळ्यांच्याच आयुष्याचा हा प्रश्न आहे. वीर तर या टीममध्ये खेळतोच पण शेवटच्या क्षणी आलेल्या अडचणींमुळे रुख्सानालाही बाबर बनून खेळावं लागतं. टीम अंतिम सामनाही जिंकते. पण तालिबानने यापूर्वीच स्टेट टीमला पाकिस्तानात पाठवायची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांची निराशा होते. पण शेवटच्या क्षणी स्टेट टीमचे ब्लेझर आणि पासपोर्ट या तालिबान क्रिकेट क्लब टीमच्या हाती लागतात आणि टीम स्वतःची धाडसी सुटका करून घेते. कशीबशी विमानतळावर पोहोचते आणि पाकिस्तानासाठीचं विमान पकडते.