*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹208
₹300
30% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
विख्यात कादंबरीकार आलेक्झान्द्र द्यूमासलिखित ‘द थ्री मस्कटिअर्स’ या रोमांचक नाट्यमय कादंबरीचा मराठी अनुवाद ! ही कथा आहे दार्तान्यॉ या शूर तरुणाची आणि त्याच्या धाडसी मोहिमांची ! फ्रान्सच्या राजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या शिलेदारांच्या म्हणजेच मस्कटिअर्सच्या तुकडीमध्ये सामील व्हायचं स्वप्न घेऊन दार्तान्यॉ पॅरिसमध्ये येतो आणि त्याची मैत्री ऍथॉस पार्थोस आणि आरामिस या मस्कटिअर्सशी होते. राजाचा मित्र कार्डिनल रिशलिय आणि रमणी गुप्तहेर मिलेडी यांच्या छुप्या आणि धूर्त कारस्थानांपासून राजाचे प्राण आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मस्कटिअर्सना प्रयत्नांची शर्थ करावी लागते| रहस्य षड्यंत्र थरार विस्मयकारक घटना तलवारबाजीच्या अखंड करामती प्रेमप्रकरणं गनिमी छापे जिवानिशी झालेल्या सुटका आणि बेफाम साहसं असा सगळा ऐवज या अजरामर कादंबरीमध्ये पानोपानी वाचायला मिळतो ! द्यूमासने साकारलेल्या या कादंबरीतल्या जगात अशक्य काहीच नाही. तसंच सगळं काही भव्यदिव्य आहे! त्या काळातली राजकीय समीकरणं आणि परिस्थिती यांच्या गुंफणीतून आकाराला आलेली कधीही संपू नये असं वाटायला लावणारी एक अभिजात कादंबरी खास ‘वर्ल्ड क्लासिक्स सीरिजमधून’ वाचकांच्या भेटीला आली आहे !.