Tissue Paper
shared
This Book is Out of Stock!


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
257
400
35% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*

About The Book

परमीट रूम बार हॉटेल ही छंदीफंदी लोकांची भुरळ घालणारी दुनिया. हे एक स्वतंत्र जग असते. तिथे झगमगाटउच्चभ्रूंचा वावर आणि अय्याशी फेर धरत असते; तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीला महाग झालेले गोरगरीब शोषितपीडित लोक या दुनियेत स्वत:ला हरप्रकारे जाळून नेस्तनाबूत करत असतात. भारतासारख्या देशातील दोन वर्गांतीलदरी पाहायची असेल तर आपल्या जवळपासचे परमीट रूम बार हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा ठिकाणीकाम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत चित्रित केलेला आहे.शोषितांच्या जगण्याचे भयावह रूप आपल्याला या कादंबरीत वाचावयास मिळते. मराठी साहित्यात अपवादानेच चित्रित होणारे अर्थशास्त्रीय वास्तव प्रकर्षाने वाचकास टोचण्या देऊ लागते. श्रीमंत गर्भश्रीमंत उच्चमध्यमवर्गमध्यमवर्ग सामान्य माणूस आणि अतिसामान्यांचे गूढ विश्व हा लेखक ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत आपल्यासमोर ठेवतो. नाचणारी-गाणारी पिणारी-पाजणारी बेहोश होणारी सांभाळणारी स्वत:ला गाडून घेऊन पुन्हा उगवणारी आणि दुसऱ्यांना जगवणारी एक जीवनेच्छा इथे प्रवाहित होताना दिसते. भाषेची परिपूर्ण जाण व्यक्तीच्या अंतर्मनाचा तळशोधण्याची प्रचंड आकांक्षा यातून या कादंबरीचे अनुभवविश्व वाचकाला श्रीमंत करून जाते. माणूस होण्यासाठी ज्यांनाज्यांना डागण्या देणे गरजेचे आहे; त्या सर्वांना डागण्या देत कधी खोलवर जखम करत ही कादंबरी आपल्याला अस्सल साहित्यकृती वाचल्याचा अनुभव देते. प्रत्यक्ष जगलेले जीवनानुभव साहित्यात जसेच्या तसे ओतून एकजिवंत कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न रमेश रावळकर यांनी ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत केलेला आहे. वाचक याकलाकृतीचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री वाटते! राजन गवस
downArrow

Details