क्षेत्र कोणतेही असो सहज काही मिळत नाही. अडचणीचं भांडवल करून काही साध्य होत नाही. सगळ्या गोष्टी काही आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. हे लक्षात घेऊन संघर्षाची तयारी प्रयत्न न सोडण्याची चिकाटी आणि ध्येयप्राप्तीसाठी वाट पाहण्याची वृत्ती अंगीकारूनच या पुस्तकातील भूमिपुत्रांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. आलेल्या समस्यांवर मात करत त्यांनी यशाचे शिखर कसे गाठले याचा उलगडा या पुस्तकात वाचायला मिळेल. त्यांच्या शालेय जीवनापासून ते अधिकारी होईपर्यंतचा त्यांचा खडतर प्रवास अगदी सहज साध्या सोप्या भाषेत मांडला आहे. स्पर्धा परीक्षेकडे येऊ इच्छिणाऱ्या व स्पर्धा परीक्षा देत असलेल्या युवकांच्या स्वप्नपूर्तीसाठी या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा निश्चितच मदतनीस ठरू शकतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी एक उत्तम मार्गदर्शक! लेखकाविषयी : २०१४मध्ये सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात; २०१५पासून ‘दैनिक सकाळ’मध्ये पत्रकार म्हणून कार्यरत सकाळ रिलीफ फंडाच्या मदतीने व लोकसहभागातून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चार गावांतील ओढा खोलीकरण व रुंदीकरण यासाठी पुढाकार पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम; शोधपत्रकारितेबरोबर प्रेरणादायी यशोगाथा लिहिण्यावर भर. शंभरहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा ‘दैनिक सकाळ’मधून प्रसिद्ध पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.