*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹399
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद 'अप अगेन्स्ट डार्कनेस - फिटे अंधाराचे जाळे' गिरीश कुलकर्णी, प्राजक्ता आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी त्यांचे सुखासीन आयुष्य सोडून अत्यंत धकाधकीचे सामाजिक आयुष्य निवडले ते अडचणीत सापडलेल्या इतर अनेकांना मदत करण्यासाठी. वेश्यागृहात विकल्या गेलेल्या तरुणींची सुटका असो, बलात्कारातून वाचलेल्यांचे पुनर्वसन असे, अनाथ मुलांना आश्रय देणे, त्यांना शिक्षण देणे, Hiv/Aids रुग्णांना मदत करणे किंवा दुर्लक्षित आणि सोडून दिलेल्या मुलांचे रक्षण करणे असो, स्नेहालयाने हे सर्वच केले आहे. ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या पुस्तकात केवळ स्नेहालयच्या कामामुळे जीवनात बदल घडलेल्या जीवनांचे दस्तऐवजीकरण नाही तर उपेक्षित लोकांशी संबंधित संस्था चालवण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीची झलकही देते. लेखकाविषयी : लेखिका मेधा देशमुख-भास्करन या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारत, जर्मनी व युनायटेड अरब एमिरेट्समधील अन्न व औषध कंपन्यांच्या व्यापार व विक्री विभागात काम केलेले आहे. भारत व गल्फमधील प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासंबंधी विपुल लेखन केले आहे. मेधा देशमुख यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेले 'चॅलेंजिंग डेस्टिनी' हे पहिले इंग्रजी पुस्तक आहे. या पुस्तकाला 'रेमंड क्रॉसवर्ड बुक'तर्फे चरित्र लेखनासाठी असलेले मानांकन मिळाले होते. 'प्रिस्क्रिप्शन ऑफ लाईफ' हे औषध निर्मिती व वैद्यकशास्त्रावरील पुस्तकही प्रकाशित झाले आहे. त्याचबरोबर 'लाईफ अॅंड डेथ ऑफ संभाजी' (इंग्रजी व मराठी) तसेच 'द स्टोरी ऑफ इम्युनिटी' ही पुस्तके प्रकाशित झाली आहे.