*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹305
₹399
23% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
जागतिक साहित्यातील श्रेष्ठ कलाकृतींचा परिचय सकाळ-अॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मला भावलेलं पुस्तक’ या स्तंभलेखनाचं हे संग्राह्य पुस्तक. ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातील प्रस्तुत पुस्तकातून आदिनाथ चव्हाण वाचकांना जागतिक साहित्य विश्वातील एकेक अनमोल नक्षत्र निरखून पाहण्याची रीत दाखवतात. इतिहास राजकारण तत्त्वज्ञान समाजशास्त्र आणि मानसशास्त्र ह्या क्षेत्रांमध्ये वाचकांनी विषयप्रवेश करावा ही कळकळ घेऊन ते आपल्याला लिओ टॉलस्टॉय हेन्री डेव्हिड थोरो खलिल जिब्रान ऑस्कर वाईल्ड अर्नेस्ट हेमिंग्वे जॉर्ज ऑरवेल बर्ट्रांड रसेल गॅब्रिअल गार्सिया मार्केझ सिंग्मंड फ्रॉइड सिमोन द बोव्हुआर आदी महानुभावांच्या विचारविश्वाचं प्रतिबिंब असलेल्या महान साहित्यकृतींची यात्रा घडवतात. या पुस्तकातील प्रत्येक लेख विश्व वाङमयातील अजरामर कृतींचं रसग्रहणात्मक सार आहे. साहजिकच हे लिखाण मूळ पुस्तक वाचल्याचा आनंद देतं. लेखकाविषयी : आदिनाथ चव्हाण हे गेली पस्तीस वर्ष पत्रकारीतेत आहेत. सकाळ माध्यम समूहात बातमीदारपदापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल या समूहाच्या ‘ॲग्रोवन’ या कृषिविषयक दैनिकाच्या संपादक संचालक पदापर्यंत पोहोचली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हे त्यांचं मूळ गाव. इथूनच त्यांचा बहुआयामी वाचनप्रवास सुरू झाला. अलंकारिकता टाळणारी साधी प्रवाही भाषा मनात घर करणारी चपखल शब्दयोजना हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक मानसन्मान पुरस्कार लाभले.