*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹270
₹340
20% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
भरपूर दूध देणाऱ्या आणि उत्कृष्ट प्रजननक्षमता असे गुणधर्म असलेल्या गायींना बाजारात प्रचंड मागणी आहे. स्वतःच्या गोठ्यातील गाई-वासरांची गुणवत्ता वाढवून नफा मिळविणे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट पैदास करून त्यांच्या विक्रीतूनही नफा मिळविणे असा दुहेरी लाभ या व्यवसायात मिळवता येऊ शकतो. वासराचे व्यावसायिक संगोपन आजची कालवड उद्याची गाय या पुस्तकात दुग्ध व्यवसायातील शेणखत मूल्यवर्धित खतनिर्मिती कालवड संगोपन व मुक्तसंचार गोठा त्यातील कोंबडीपालन अशा अनेक विषयांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळते. त्यामुळे दुग्ध व्यवसायाबरोबरच प्रजनन वासरू संगोपनासाठी आवश्यक आधुनिक तंत्रशुद्ध माहिती शासकीय नियम योजना व सवलती यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितपणे लाभदायी ठरेल. लेखकाविषयी : डॉ. शांताराम पांडुरंग गायकवाड यांनी १९९४मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांनी मयूर सहकारी दूध संघ कोल्हापूर येथे मोफत पशुवैद्यकीय सेवा कमी खर्चाची कृत्रिम रेतन योजना पशुखाद्य उत्पादन व दूध संकलन या क्षेत्रात प्रभावी काम केले. त्या नंतर दोन वर्षे पुणे जिल्हा दूध संघात विस्तार सेवेचे कामकाज पाहिले. गेल्या १६ वर्षांपासून ते गोविंद मिल्क प्रॉडक्ट्स या डेअरीत कार्यरत आहेत. कमी खर्चाचे हायड्रोपोनिक चारा उत्पादन युनिट मुक्तसंचार गोठा व मुरघास तंत्रज्ञान कमी खर्चाचे मुरघास निर्मिती तंत्र कमी खर्चाचा स्मार्ट दुग्ध व्यवसाय ही पुस्तके सकाळ प्रकाशनामार्फत प्रकाशित झाली आहेत.