*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹121
₹130
6% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाने आणि जिद्दीने शिरवाडकरांसारखा प्रतिभावंत लेखक प्रभावित झाला नाही तर आश्चर्य. १८५७ साली पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील सहभाग आणि स्त्री-शक्तीचे दर्शन हे लक्ष्मीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन्ही पैलू लोभावणारे आहेत. इंग्रजांविरुद्ध हिंदुस्थानातील पहिला सशस्त्र उठाव १८५७ मधे झाला तेव्हा शस्त्रबळ कमी असूनही अनेक वीरांनी झुंज दिली. त्यांत लक्ष्मीबाई तर होत्याच शिवाय त्यांना साथ देणाऱ्या जुलेखासारख्या स्त्रियाही होत्या. जुलेखाने तर रणांगणावरही आपले कलाप्रेम सोडले नव्हते. निरनिराळे धर्म अलगअलग सामाजिक स्तर यामधील स्त्रियांनी एकत्र येऊन लढा कसा चालू ठेवला याचे हृदयंगम चित्र ह्या नाटकात आढळते. त्यामुळे लक्ष्मीबाईइतकीच जुलेखा ही व्यक्तिरेखाही प्रभावी ठरते मनाचा ठाव घेते. निव्वळ स्वातंत्र्यसंग्रामातील एक पान म्हणून न पाहता देशप्रेमाने प्रभावित झालेल्या ह्या स्त्रियांच्या व्यक्तिगत जीवनाकडेही शिरवाडकरांनी पाहिल्यामुळे या नाटकाला वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. स्वतः शिरवडकर या नाटकाचा आपले सर्वात आवडते नाटक म्हणून उल्लेख करीत असत. मुळात १९७० साली लिहिलेल्या नाटकाची ही ‘शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्ती’. यात नाटकाची संहिता आणि पहिला नाट्यप्रयोग यांविषयी लेखक आणि नाट्यकर्मी फैय्याज शेख यांची निवदने दिली आहेत.