Vilasmandir

About The Book

इतिहास - काळातील राजे व सरदार यांची विश्रांती घेण्याची व विलास करण्याचे खास वाडे बांधलेले असत. त्या वाड्यांनाच विलासमंदिर असे म्हणत. या विलासमंदिरात जी कारस्थाने होत बेत रचले जात त्याचेच वर्णन या कादंबरीत आहे. म्हणून विलासमंदिर हे सार्थ नाव ठेवले आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांचीही अशी विलासमंदिरे असतात. त्यांना आधुनिक भाषेत 'फार्महाऊस' असे म्हणतात इतकेच. अशा विलासमंदिराभोवती बहुतेक वेळा उपवन किंवा उद्यान केलेले असते. या कादंबरीत राजा नसून इरावती या राणीचे राज्य आहे. कादंबरीची सुरूवातच विलासमंदिर येथून झालेली आहे. कादंबरीतील नावे व वर्णन यावरुन या कादंबरीतील घटना हजार वर्षापूर्वीच्या आहेत असे वाटते. गो. ना. दातार हे स्वतः वैद्य होते. ते आयुर्वेदिक औषधे देत असत. म्हणूनच त्यांच्या कादंबरीत एका वैद्याचे पात्र असतेच. गो. ना. दातारांच्या सर्वच कादंबऱ्याप्रमाणे या कांदबरीतही रहस्यमय घटना आहेत आणि कांदबरीचा शेवट विवाह समारंभाने होतो.श्री. गो. ना. दातार हे माझ्या कुमारवयात मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कादंबरीकार. त्यांच्या कांदबऱ्या म्हणजे कमालीची रंजकता कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता अद्भुत घटनांचा अखंड ठसठशीत प्रवाह व्यक्तीचित्रणे चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंबऱ्यात झालेला आहे. घरात जवळपास वा वाचनालयात उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या सर्व कादंबऱ्या मी शोध घेऊन वाचल्या; पण कालिकामूर्ती व बंधुद्वेष अधिक आवडल्या. आपल्या नित्य जीवनातून एका रंगीबेरंगी विश्वात आपल्याला नेण्याचे या कादंबऱ्यांचे सामर्थ्य असाधारणच आहे. रेनॉल्ड्स यांच्या कादंबर्‍यांवरुन या कादंबऱ्या रुपांतरीत केलेल्या आहेत हे पुढे केव्हा तरी मला कळले. काहीच बिघडले नाही. परस्थतेचा वास देखील या लेखनाला कधी आला नाही. उत्तम रुपांतर ही देखील एका मर्यादेत; पण नवनिर्मितीच असते. मराठी कादंबरीच्या विकासात दातारांचे ऋण कोणी ना मानो; मी मात्र वाड्.मयीन व्यवहाराकडे वाचकाला वाहून नेणारा एक प्रकांड साहित्यकार म्हणून त्यांना खूप मानतो. रहस्यकथांत रस असणाऱ्यांसाठी दातारांनी हा अमोल खजिनाच निर्माण करुन ठेवला आहे.- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE