सेंद्रिय शेतीस पूरक असणाऱ्या बियाणांची विस्तृत माहिती 'विविध पिकांचे पेरणीयोग्य वाण' या पुस्तकात सेंद्रिय व बायोडायनामिक शेती पद्धतीचे अभ्यासक लेखक दिलीपराव देशमुख बारडकर यांनी दिली आहे. *महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांची प्रकाशने, शास्त्रज्ञांचे प्रकाशित लेख, शेतकर्यांच्या यशोगाथा या सर्वांचा आधार घेऊन पिकांच्या सुधारित, सरळ, संकरित वाणांची व पेरणीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. *नगदी, तृणधान्य, तेलबिया, कडधान्य, भाजीपाला, मसाला पिके, फळझाडे, फूलझाडे, औषधी वनस्पती व चारापिकांसह १६३ वाणांची उपयुक्त माहिती यामध्ये दिली आहे. *पिकांच्या पेरणीयोग्य वाणांची माहिती आणि त्यासाठी संपर्काचे पत्तेही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिले आहेत. *गेल्या ८० वर्षांपासून जगातील सुमारे ७० देशांतील शेतकरी पेरणीसह सर्व शेतीकामासाठी वापरत असलेल्या 'बायोडायनामिक कॅलेंडर'ची माहिती यामध्ये दिली आहे. *शेतकरी, कृषी अभ्यासक, विद्यार्थी आणि शेतीची आवड असणारे सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरणारे पुस्तक! दिलीपराव देशमुख बारडकर महाराष्ट्र ऑर्गनिक फार्मिंग फेडरेशन (MOFF), पुणे, महाराष्ट्र या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. विविध यशस्वी कृषिप्रयोगांवर आधारित मार्गदर्शनपर नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जागतिक कृषी परिषद, २०१९मध्ये कृतिशील सहभागाबद्दल प्रशस्तिपत्र, त्याशिवाय शेतीमित्र, सिंचन मित्र, सेंद्रिय शेती शिल्पकार, स्व. शंकरराव किर्लोस्कर पारितोषिक, रेसिड्यू फ्री अॅण्ड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशनचे प्रशस्तिपत्र अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.