About the Book -

मित्रांनो जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पुढील दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात:-
मनी माईंडसेट डेव्हलपमेंट (पैशांच्या मानसिकतेचा विकास)

मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी (पैशांच्या व्यवस्थापनाचे धोरण)
यात मनी माईंडसेट डेव्हलपमेंट हे आपल्या आर्थिक आयुष्यावर 80 टक्के परिणाम करते आणि मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी या 20 टक्के परिणाम करतात त्यामुळे या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

तर आपल्या आर्थिक आयुष्यावर 80% परिणाम करणारा मनी माईंड सेट वाढवायचा कसा? पैशांचे मानसशास्त्र समजून घ्यायचे कसे? त्याचा वापर करायचा कसा? या गोष्टी आपल्याला शालेय शिक्षणामध्ये शिकवल्या गेलेल्या नाहीत म्हणून आपण यशस्वी होत नाही जर या दोन्हीही गोष्टी आपल्याला समजल्या की काय आणि कशा करायच्या आहेत तर आपण आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

About the Authors -

दादा भापकर हे मनी माईंडसेट डेव्हलपमेंट ट्रेनर आणि फायनान्शियल कोच आहेत. त्यांनी वयाच्या 29 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.

मोहसिन पठाण हे NLP ट्रेनर आणि काउन्सलर आहेत. त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून व्यवसायिक-सामाजिक नातेसंबंध आणि वैयक्तिक विकास यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत.