तुमच्या जीवनात तुम्हाला जे हवे आहे ते सर्वकाही मिळू शकते; कारण तुमच्या आत एक वैश्विक शक्ती दडलेली आहे जी तुमची सगळी स्वप्ने साकार करू शकते. वैश्विक शक्ती संपूर्ण जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. तुमच्या आत दडलेल्या अशा अभूतपूर्व वैश्विक शक्तीचा शोध घ्यायला लावणारे हे सर्वोत्तम पुस्तक. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर या शक्तीचा प्रभाव पडत असतो हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. वैश्विक शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता याचे रहस्य या पुस्तकातून निश्चित उलगडते. • प्रत्येक स्वप्न साकारू शकता. • संपूर्ण जीवन बदलू शकता. • समृद्ध जीवनात पाऊल टाकू शकता. • जीवनात प्रेमाला आमंत्रित करू शकता. • विसंवादाऐवजी सुसंवाद साधू शकता. • वैयक्तिक नातेसंबंध सुदृढ बनवू शकता. • दुःख यातना यांच्याऐवजी सुख शांतता नांदवू शकता. • आजारांना पळवून निरोगी बनू शकता. • व्यावसायिक यश संपादित करू शकता. • दैनंदिन जीवनात चमत्कार घडवून आणू शकता. • या शक्तीशी एकरूप होऊन स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात दैवी कृपाप्रसादाचा वर्षाव करून घेऊ शकता.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.