You Can Heal Your Life Books In Marathi Louise L. Hay Book Author मराठी पुस्तक पुस्तके पुस्तकं बुक बुक्स Self Help L Motivational Bestseller लुईस एल हे Best Seller Luis Hey हील युअर बॉडी हिल
जर तुम्हाला बौद्धिक काम करण्याची इच्छा असेल तर जवळपास काहीही पूर्णपणे बरे होऊ शकते. - लुईस एल. हे यू कॅन हील युवर लाईफ हे सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर आरोग्य आणि सुस्थितीतील जीवनाबद्दल परिणामकारक प्रभाव पडतो अशा आशयाची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. जगविख्यात अध्यापक लुईस एल. हे यांनी मन आणि शरीर यांच्यातील अंतरंगाचे यथार्थ दर्शन या पुस्तकाद्वारे घडविले आहे. मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पनांमुळे आपल्यावर विशिष्ट प्रकारचे बंधन येते. त्या स्थितीचा अभ्यास करून लुईस हे यांनी आपल्याला शारीरिक व्याधी आणि अस्वस्थतेची कारणे समजावून घेण्याची गरूकिल्ली दिली आहे. जगभरातील लाखो लोकांना अनेकविध कल्पना सुचवणारी आणि स्वतःला स्वतःचीच मदत मिळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी मार्गदर्शिका असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. विचारांना नवी दिशा देणारे हे आरोग्यविषयक प्रेरणादायी विवेचन आहे. लुईस हे या अधिव्याख्याता आणि अध्यापक आहेत. बेस्ट सेलर ठरलेल्या २७ पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. हील युवर बॉडी आणि दी पॉवर इज विदीन यू ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. Br>जगातील निरनिराळ्या २६ भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले असून ३५ देशांमध्ये ती पुस्तके उपलब्ध आहेत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.