*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹577
₹799
27% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या विषयाच्या तंत्रज्ञानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे झिरो रेसिड्यू अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान हे पुस्तक महत्त्वाचे ठरू शकते! अवशेषमुक्त शेती पद्धती ही मानवी आरोग्य पर्यावरण व जैवविविधता यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. लेखकाने अवशेषमुक्त म्हणजेच झिरो रेसिड्यूची वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. अवशेष पातळी लेबल क्लेम उत्तम शेतीपद्धती कृषी रसायनांचा सुरक्षित आणि सुयोग्य वापर अवशेष पातळीबद्दल सतर्कता आणि जागरुकता अशी काही महत्त्वपूर्ण मानके तसेच कमाल सेंद्रिय शेतीसाठी जैविक निविष्ठा घटकांबद्दल अतिशय सविस्तर शास्त्रोक्त माहिती यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वैज्ञानिक पद्धतीने केल्यास पिकांचे उत्पादन व प्रत हे शाश्वत स्वरूपात मिळवून शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध आणि जगाचा पोशिंदा नव्हे तर आरोग्याचा दूत देखील होऊ शकतो; हे यामध्ये सप्रमाण मांडले आहे.